Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

महाभारतकालीन राजा सत्यदेव

  महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश् ‍ चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला...

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

शिष्य समर्थांना म्हणाला

  एक शिष्य समर्थांना म्हणाला, मी उपासनेला बसलो की माझ्या मनात अनेक विचार येतात त्यामुळे माझी उपासना उत्तम होत नाही. याउलट विचारचक्र वाढत जाते तेव्हा यावर उपाय सांगा. समर्थ हसले, समर्थांनी त्या शिष्याला एक काम सांगितले. समर्थ म्हणाले, त्या बाजूच्या छोट्या नदीतून पाणी घेऊन ये. शिष्य पाणी आणायला गेला. त्या नदीच्या किनाऱ्यावर काही बायका कपडे धूत होत्या. भांडी घासत होत्या. त्या नदीतून एक बैलगाडी गेली. त्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालं होतं. तो शिष्य तसाच समर्थजवळ रिकाम्या हाती परतला. आणि समर्थाना म्हणाला, नदीचं पाणी गढूळ झालं आहे. समर्थ हसले, म्हणाले जा थांब थोडा वेळ आणि पाणी घेऊन ये. तसा तो गेला त्याने पाहिलं नदीवर आता कोणीच नाही. पाणी स्वच्छ झालं होतं. गाळ तळाला जाऊन बसला होता. त्या शिष्याने त्या भांड्यात पाणी घेतले आणि समर्थाजवळ आला. समर्थ म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का. समर्थ म्हणाले, थोडा वेळ थांबल्यावर पाणी स्वच्छ झाले व नदीचे पाणी स्वच्छ वाहते आहे. समर्थ म्हणाले, मनाचे ही तसेच आहे, " उपासनेला बसल्यावर असे अनेक गढूळ विचार येतील पण कालांतराने ते निघून ही जातील. पण आपली उ...

अपमान आणि उपकार

  एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,” आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,”आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्...

आपणास हे माहित आहे का ?

  तेहतीस कोटी देव कोणते ? उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे - आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास. अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू. असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३

अजी मी देव पाहिला.....🙏😊

  सद्या दहा दिवस देव देवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मीठाया बनवून जरा दमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं पाहुण्यांनसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का?तीने शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा माझ्या तोंडात भरला.तीने खातांना म्हटले बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते.मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आली आहे, तीच्या साठी करीन म्हणते.केवढ्याला येत हो काकु हे पीठ ?मी सहजतेने म्हटलं असेल साठ,सत्तर रु.पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली बापरे,एवढ महाग असत.त्यासरशी माझा घास घशातच अडकला. किती सहजतेने मी फक्त साठ, सत्तर म्हणाली.खरतरं एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली.पण हिची कथा अधिक संघर्षमय होती.मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या तीन लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हीचे लग्न लावून दिले. ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तीच्या पदरात टाकून आजाराच निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घराचा उंबरठा न ओलांड-लेली पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी आईशिवाय क...

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...

सगुण रुपाची आवश्यकता.

भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो. चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता ॥ आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक् ‍ त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यस...

देहात्म योग याचा अर्थ

  ॥ श्री ॥ देहात्म योग याचा अर्थ देह अधिक आत्मा या दोघांचा संयोग असलेली स्थिती.जोपर्यंत देहात चैतन्यरूपी आत्मतत्वाचे जे प्रागट्य होत आहे तोपर्यंत देहामध्ये संवेदना आहे.तो अंतरात्माच देहामध्ये राहून अनंत कर्म करून घेतो.पण ज्याक्षणी देहाचा प्राणरूपाने त्याग केला त्याक्षणी गलितगात्र होऊन पडतो.अशा देहामध्ये अंतरात्म्याला जाणण्यासाठी जाणीव, संवेदनशीलता,निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी वाणीला आत्मानुभूतीची जोड हवी.अशा दोन मनाच्या सूक्ष्म अवस्थांच्या आधारे आपल्याला आत्मारामाचे दर्शन प्राप्त करून घेता येवू शकते.आणि ही अंतःकरणाची प्राप्त करण्याचे साधन म्हणजे भगवंताचे नाम.म्हणून समर्थ आत्मारामाच्या दर्शनासाठी,या दोन तत्वांच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगताना म्हणतात..... *सकळ जनामधें नाम ! रामनाम उत्तमोत्तम ! श्रम जाउनी विश्राम ! चंद्रमौळी पावला !! या सृष्टीमध्ये जर आज भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारी संवेदनाशीलता ही आत्मानूभूती कशाने प्राप्त होत असेल तर त्याचे साधे सोपे साधन भगवंताच्या नामाचे आहे.आणि त्या नामामध्ये देखील ज्याचे मन रामनामावर अनुरूक्त झालं,...

आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय?

  एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता. दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता. वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता. एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ? न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ... झाले !!! दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला. मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता ! दृष्टांत संपला आत्ता सिद्...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...

नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर

  ।। श्रीराम समर्थ ।। सदगुरु कृपेने । घेता मुखी नाम । गुरु सत्ता मर्म । ध्यानी येते ।। १ ।।  तेणें अहंकार । होत असे दूर । नाम निरंतर । मुखी घेता ।। २ ।।  साधनेचा नाश । अहंभावनेने । मीठ संयोगाने । दूध जेवीं ।। ३ ।।  बनता साखर । नामस्मरणाने । सदगुरु खात्रीने । भेटतील ।। ४ ।।  नाम सदगुरूंकडून घेणे श्रेयस्कर. सदगुरू नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो हे त्या नामाचे मर्म आहे. नाम निरंतर घेतल्याने, ' मी नामस्मरण करतो ' अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच उरत नाही. मिठाचा एकच खडा खीर नसवायला पुरेसा होतो, त्याप्रमाणे अभिमान सर्व साधन नसवायला कारणीभूत होतो. तुम्ही अखंड नामस्मरणात राहिल्यास, भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यास सदगुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. . ।। जय जय रघुवीर समर्थ ।। #Dasbodh   #dasbodhnirupan   #ramdasswami   #ramdas   #jaisadguru   #jayjayraghuveersamrth   #jaysadguru

रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.

🌸🌸 साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान...

माझ्याकडे जे आहे त्यातून सर्वोत्तम काय मिळेल

  1) एक मुलाने २० वर्षानंतर त्याच्या एका मित्राला मर्सिडीज चालवताना पाहिलं. त्याला स्वतःबद्दल खुप वाईट वाटलं, की तो आयुष्यात नापास झाला आहे. पण त्याला हे माहित नव्हतं की तो मित्र त्या गाडीवर ड्रायव्हर होता व तो त्याच्या बॉस ला घ्यायला निघाला होता. 2) एक स्त्री तिच्या नवऱ्यावर नाराज होती की तो अजिबात रोमॅन्टिक नाही, त्याने गाडीतून उतरताना तिच्यासाठी दरवाजा उघडावा जसा तिच्या मैत्रीणीचा नवरा उघडतो. पण तिला हे माहीत नव्हतं की मैत्रीणीच्या गाडीचा दरवाजा खराब आहे व तो फक्त बाहेरूनच उघडला जातो. 3) एक व्यक्ती शेजारील घरातील तीन मुले खेळताना बघून नाराज होत होता की त्याला फक्त एकच मुलगा आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या तीन मुलांपैकी एक दुर्धर रोगाने आजारी आहे व बाकीची दोन मुले दत्तक घेतलेली आहेत. आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकाच तराजूत मोजली नाही जाऊ शकत. म्हणून बाकीच्या लोकांकडे बघून तुमच्या आयुष्याबद्दल तक्रार करू नका. कारण तुम्हास हे माहीत नसेल की इतरांपेक्षा तुम्हीच जास्त नशीबवान असू शकता. तुम्ही जसे आहात तसेच आयुष्य मजेत घालवा कारण तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे. आनंद हा *माझ्याकडे सर...