Skip to main content

सगुण रुपाची आवश्यकता.



भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो.
चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता ॥
आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यसाधारण आहे.
‘समाजाची विभागणी चतुर्वणात मीच सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या आधारे केली आहे. ह्या क्रियेचा कर्ता मी आहे असे जरी भासले तरी या सर्वांत मी अकर्ता आणि अविनाशी आहे असे जाण. (माझ्या)कुठल्याही कर्माचा लेप मला लागत नाही आणि केल्या कर्माच्या फळाची मला अजिबात इच्छा नाही. मला असे जाणून जो आपले कर्म करतो तोही स्वतःच्या कर्मांच्या बंधनात अडकत नाही. मला असे पूर्ण जाणून मगच भूतकाळातील मोक्षाची आस्था असलेल्यांनी कर्मे केली (आणि त्यायोगे ते मुक्त झाले). तेव्हा तूसुध्दा पूर्वकाळच्या मूमुक्षुंनी केलेल्या कर्माप्रमाणे कृती कर (आणि स्वतःचे भले करुन घे).’
न मां कर्माणि लिंपंति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बद्ध्यते ॥ गीता ॥
‘योग: कर्मसु कौशलम्‌’ म्हणजे काय तर कर्मे करण्यातील कुशलता म्हणजे खरा भगवंताशी योग होय. परंतू इथे कुशलता म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. द्वितीय अध्यायातील या शब्दांचा आधार घेऊन स्वतःसमोर आलेली कर्मे आपली सर्व शक्ती पणाला लावून, मनापासून, करावीत हाच कर्मयोग आहे असे कुणी म्हणतात. परंतु तसे जर असते तर पाश्चात्य संस्कृतीत आणि पौर्वात्य संस्कृतीत काहीच भिन्नता दिसली नसती.
समाजात पुढे जाण्यासाठी कर्मे कुशलतेने करणारे आणि भगवंताच्या जवळ जाण्याकरीता कर्मे करण्यात मन लावणारे यांत काय फरक दिसला असता? जीवाचा आटापिटा करुन नोकरीत पुढे जाण्याच्या धडपडीला ‘मी देवाने सांगितल्याप्रमाणे कर्मातील कुशलता आचरणात आणत आहे’ असे म्हणणारे लोक उच्च साधक ठरले असते. त्यांची भगवंताशी जवळिक दिसली असती. आणि अशा संसारामधील प्रगतीबद्दल आसक्ती ठेवून कर्मे करणाऱ्यांमध्येही त्यांच्या मनाच्या योगस्थितीचे दृश्य रुप म्हणजे मनाची अखंडित शांतता दिसली असती. परंतु ही शांतता नोकरीत पुढे जाण्याची इच्छा धरणाऱ्यांच्या जीवनात तीच्या अभावानेच जाणविते, तीच्या अस्तित्वाने नाही!! तेव्हा कर्म करण्यातील कुशलता म्हणजे हातातील कर्म तन-मन पणाला लावून पार पाडण्याची वृत्ती नाही हे स्पष्ट होते.
बुध्दीयोगाने म्हणजे निव्वळ विवेकाने आपले जीवन जगून भगवंताकडे जाणारे लोक अतिशय विरळा असतात.
भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. 'मी भगवंताचा औंश आहे' असे म्हटल्यावर सर्व जगत् आपल्याला भगवत्स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहात नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहू या. जगात भगवंतावाचून सत्य वस्तू नाही आपले शरीर असत्य आहे ही ज्याची निष्ठा तोच खरा.
भगवंत असण्याची जी स्थिति तिचे नाव भक्ति; आणि हा सर्व विस्तार माझा नाही त्या भगवंताचा आहे या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य. हा शुद्ध विचार असणे हाच विवेक आहे.*ईश्वर परमश्रेष्ठ अव्यक्त तत्व आहे हे आपण हे आपण पाहिले. ते अव्यक्त आहे म्हणूनच निराकारही आहे. कारण एखादी वस्तू व्यक्त होते तेव्हा त्याला कोणतातरी आकारप्राप्त होतो. मग तिला काही तरी नाव मिळते. म्हणजेच नाम व रूप हे साकार वस्तूचे असते. अशी आकार धारण केलेली वस्तू 'दृश्य' होते 'जड' होते. पण परमात्मा दृष्टा, साक्षी आहे. स्वःताचा कोणताही आकार त्याला नाही.
'हा लोकत्रयाकार | जो जयाचा विस्तार | जेथ नाम वर्ण आकार | चिन्ह नाही ||
परब्रह्माच्या ठायी एकोहं असे स्फुरण होते. त्यातून मूळमाया निर्माण होते. समीर म्हणजे वायु. वारा नव्हे. मायेमधील सूप्त वायुतत्व तीच जाणती कळा. हे जे चैतन्य आहे तो ईश्वर किंवा सर्वेश्वर म्हणून ओळखला जातो.
🙏🏻

Comments

Popular posts from this blog

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...