Skip to main content

Posts

Showing posts with the label Bodhkatha

महाभारतकालीन राजा सत्यदेव

  महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश् ‍ चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला...

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

शिष्य समर्थांना म्हणाला

  एक शिष्य समर्थांना म्हणाला, मी उपासनेला बसलो की माझ्या मनात अनेक विचार येतात त्यामुळे माझी उपासना उत्तम होत नाही. याउलट विचारचक्र वाढत जाते तेव्हा यावर उपाय सांगा. समर्थ हसले, समर्थांनी त्या शिष्याला एक काम सांगितले. समर्थ म्हणाले, त्या बाजूच्या छोट्या नदीतून पाणी घेऊन ये. शिष्य पाणी आणायला गेला. त्या नदीच्या किनाऱ्यावर काही बायका कपडे धूत होत्या. भांडी घासत होत्या. त्या नदीतून एक बैलगाडी गेली. त्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालं होतं. तो शिष्य तसाच समर्थजवळ रिकाम्या हाती परतला. आणि समर्थाना म्हणाला, नदीचं पाणी गढूळ झालं आहे. समर्थ हसले, म्हणाले जा थांब थोडा वेळ आणि पाणी घेऊन ये. तसा तो गेला त्याने पाहिलं नदीवर आता कोणीच नाही. पाणी स्वच्छ झालं होतं. गाळ तळाला जाऊन बसला होता. त्या शिष्याने त्या भांड्यात पाणी घेतले आणि समर्थाजवळ आला. समर्थ म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का. समर्थ म्हणाले, थोडा वेळ थांबल्यावर पाणी स्वच्छ झाले व नदीचे पाणी स्वच्छ वाहते आहे. समर्थ म्हणाले, मनाचे ही तसेच आहे, " उपासनेला बसल्यावर असे अनेक गढूळ विचार येतील पण कालांतराने ते निघून ही जातील. पण आपली उ...

अपमान आणि उपकार

  एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,” आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,”आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्...