Skip to main content

Posts

Showing posts with the label story

आपणास हे माहित आहे का ?

  तेहतीस कोटी देव कोणते ? उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे - आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास. अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू. असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३

अजी मी देव पाहिला.....🙏😊

  सद्या दहा दिवस देव देवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मीठाया बनवून जरा दमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं पाहुण्यांनसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का?तीने शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा माझ्या तोंडात भरला.तीने खातांना म्हटले बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते.मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आली आहे, तीच्या साठी करीन म्हणते.केवढ्याला येत हो काकु हे पीठ ?मी सहजतेने म्हटलं असेल साठ,सत्तर रु.पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली बापरे,एवढ महाग असत.त्यासरशी माझा घास घशातच अडकला. किती सहजतेने मी फक्त साठ, सत्तर म्हणाली.खरतरं एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली.पण हिची कथा अधिक संघर्षमय होती.मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या तीन लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हीचे लग्न लावून दिले. ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तीच्या पदरात टाकून आजाराच निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घराचा उंबरठा न ओलांड-लेली पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी आईशिवाय क...

सगुण रुपाची आवश्यकता.

भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो. चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ गीता ॥ आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक् ‍ त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यस...

आपण कशाला मनुष्य जन्माला आलोय?

  एका सद्गृहस्थाच्या घरात एक दगड होता . तो अनेक कामी यायचा. म्हणून त्याने तो ठेवला होता. दरवाजा अपोआप पुढे जाऊ लागला कि त्याला दरवाजाला लावायचा, मुलांना काही खेळायचे असल्यास तोच दगड, घरात कुत्र आल सौभाग्यवतींनी फेकून मारला, अशा असंख्य कामाला यायचा म्हणून तो दगड खितपत घरात पडला होता. वापरून वापरून त्याची झीज झाली होती आणी गोल घुमट झाला होता. एक दिवस त्या सद्गृहस्थांच्या घरी एक पाहुणे आले . सहज नजर पडली त्या दगडावर. पडली तर त्याची झीज होऊन होऊन एका बाजूने थोडा चमकत होता . सराफ कुळातील असल्याने त्यांनी परीक्षण केले आणी म्हणाले काय हो हे इतका मौलिक रत्न तुम्ही घराच्या दाराला अडसर म्हणून उभ केलंत ? न समजून त्या सद्गृहस्थाने त्यांना प्रश्न उलट प्रश्न केला. ते रत्नपारखी म्हणाले , अहो खरंच हा साधा सुधा दगड नसून अलौकिक रत्न आहे . ते आज त्याची किंमत १० कोट च्या घरात तरी असेल ... झाले !!! दगडाचे जीवनच बदलले . खसकन त्या गृहस्थाने तो दगड पाहुण्यांच्या हातून खेचला आणी तिजोरीत ठेवला. मग कालपर्यंत नीच कामासाठी वापरत येणारा हा दगड आत्ता अलौकिक रत्न बनून तिजोरीत राहत होता ! दृष्टांत संपला आत्ता सिद्...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...

रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.

🌸🌸 साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान...