Skip to main content

अजी मी देव पाहिला.....🙏😊

 


सद्या दहा दिवस देव देवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मीठाया बनवून जरा दमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाल्या बाईला म्हटलं पाहुण्यांनसाठी म्हणून थोडा शेव चिवडा बनवून देतेस का?तीने शिंगाड्याची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा
माझ्या तोंडात भरला.तीने खातांना म्हटले बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते.मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी आली आहे, तीच्या साठी करीन म्हणते.केवढ्याला येत हो काकु हे पीठ ?मी सहजतेने म्हटलं
असेल साठ,सत्तर रु.पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली बापरे,एवढ महाग असत.त्यासरशी माझा घास घशातच अडकला.
किती सहजतेने मी फक्त साठ,
सत्तर म्हणाली.खरतरं एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली.पण हिची कथा अधिक संघर्षमय होती.मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या तीन लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हीचे लग्न लावून दिले. ते कमी की काय म्हणून अजून दोन मुली तीच्या पदरात टाकून आजाराच निमित्त
होऊन पतीही कायमचा सोडून गेला.
कधीही घराचा उंबरठा न ओलांड-लेली पोराबाळांसाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी आईशिवाय कुणी नाही. कसाबसा तोंडातला घास संपवला व एका डब्यात देवासाठी म्हणून बनवलेले थोडे लाडू, पेढे, अनारसे व थोडी शेव व आलेल्या साड्यातून बऱ्यापैकी एक हिरव्या रंगाची साडी काढून तीच्या हातात ठेवली, म्हटलं घे तुझ्या लेकीला दे माझ्याकडून.त्यासरशी तीला एकदम गलबलून आल.म्हणाली हे काय करताय काकु,देवासाठी बनवलेले मला का देता. पाप लागेल ना मला.
मी-अग देव कुठे खातो का काही. आपलीच श्रद्धा. नंतर कुणाला तरी देणारच कि, त्यापेक्षा मी दोन्ही हाथ जोडून भावपूजाच करेल.तसही मी फार देव देव करत नाही.
संकोचून तीने घेतले व सहज तीचे लक्ष माझ्या पायाकडे गेले .म्हणाली काय झाले काकु पायाला?मी म्हटलं
अग,काही नाही सकाळी फिरायला जातांना अंधारात खड्यात पाय मुरगळला. लेप लावत आहे होईल बरा.त्यासरशी म्हणाली तेल कुठे आहे द्या लावून देते.बरे वाटेल जरा. मी म्हटलं अग राहू दे .पण मनातून वाटतच होत कुणी चोळल तर बर होईल.मग मी पण जास्त आढेवेढे न घेता वाटीत तेल गरम करुन तिच्या पुढे पाय केला. ती हळूवारपणे चोळत होती. त्यासरशी माझ्या शरीरात एक सुखद वेदनेची लहर उमटत होती. मी शांतपणे तीचा आत्मियतेने फिरणारा स्पर्श अनुभवत होते. आणि विचार करीत होते ,मुलांकडे गेल्यावर हजारो रुपये देऊनही 'स्पा'मधे ऐवढा आनंद येत नाही त्यापेक्षा कितीतरी पट आनंद ह्या आपूलकीच्या स्पर्शात आहे.
आमच्यातील हे बोलणं हाँल मधे टि.व्ही.पाहात असलेल्या माझ्या यजमानांनी कधी ऐकला कुणास ठाऊक. संध्याकाळी किराणा सामाना सोबत एक शिंगाडा पीठाची पुडी हातात दीली. मी म्हटले आता तर आणलं होत,परत कशाला. तर म्हणाले दे तीला, खातील तीची मुल पोटभर.
तीन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावतांना सम ई च्या त्या मंद प्रकाशात फोटोतील मूर्ती रोजच्यापेक्षा अधिकच प्रसन्न भासली.जणू म्हणत होती.अग,वेडे माझ्यापुढे रोज कर्मकांडाची सक्तीची दोन तीन तास कवायत करुन पाय,कंबर दुखावून घेण्यापेक्षा दीन दुबळ्यांमधेच मला शोध.आणि बघ खरं समाधान, शांती मीळते की नाही.
यालाच देव भेटणं म्हणत असतील का?😊


Comments

Popular posts from this blog

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...