भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, स्वामी समर्थ, योगानंद, विवेकानंद वगैरे) म्हणतात देव हा एकच आहे. त्याने तुमच्या आमच्या जड जीवांचा उध्दार करण्या साठी अशी रूपे धारण केली कारण साकाराची भक्तीत गोडी लागल्या शिवाय निर्गुणाची भक्तीची गोडी लागणार नाही. त्याच एका देवांनी अनेक रूपे धारण केली आणि आपण अनेक रूपामध्ये अडकलो. चातुर्वण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ गीता ॥ आपल्या साधनेची सुरुवात स्वतःच्या मनाला शुध्द करण्यापासून होत असते आणि ही माणसे जन्मतःच संसारापासून अलिप्त असतात. कर्मयोग म्हणजे आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी अत्यंत उपयुक् त असलेला साबण होय. त्यामुळे बहुतांशी लोकांना कर्मयोगाच्या मार्गानेच भगवंताची प्राप्ती होणार असल्याने ह्या श्लोकांचे महत्व आपल्यासारख्यांना अनन्यस...
त्या पलीकडे जाऊन श्री समर्थ म्हणतात, नमस्काराने समोरच्याचे मनही पालटते.