Skip to main content

रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा.




🌸🌸 साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय.

भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल.
खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतःदेखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय,
देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. 🌸३८. समाधान हीच खर्‍या आनंदाची खूण आहे.🌸
#Dasbodh #dasbodhnirupan #ramdas #baithak #jaysadguru #jayjay #raghuveersamrth #Marathi

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ

  उत्तम बोध. समर्थ म्हणाले दोन मिनिटे अधिष्ठानाकडे नीट बघ. प्रथम सदगुरू स्मित हास्य करीत आहेत. घराच्या कोणत्याही कोपर् ‍ यात उभा राहिलास तरी सदगुरू तुझ्याचकडे पहात आहे हे जाणवेल. गळ्यातील चार स्मरणिका म्हणजे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांचे प्रतिक आहे आणि जटेवरची स्मरणिका म्हणजे उन्मनी अवस्था दाखवली आहे. मागे कल्पवृक्ष आहे त्यावर फळे कोठेही नाही तरीही पक्षी आहेत.फळ म्हणजे तुझी उपासना ती दाखवली नाही कारण लगेच देहाकडे अहंकार आला असता. सर्व पक्षी कल्पवृक्षावर बसले आहेत फक्त एक पांढरा पक्षी फडफड करीत आहे सदगुरू म्हणाले की तो तूझे प्रतिक आहे. काही प्रसंग आला की देता की जाऊ अशा स्थितीतला. चार श्वान म्हणजे चार वेद आहेत. सदगुरू चरणी जे गाठोडे आहे त्यात तुझी चिंता, काळजी आणी मागण्या ठेवून मोकळी हो. मागे पाण्यात नाव आहे पण नाव चालवणारा नावाडी आणि वल्हव किंवा वल्ही त्यात नाही. समर्थ म्हणाले की नावाडी तूच आहेस पाणी म्हणजे हा भवसागर आणि वल्हीवल्हव म्हणजे तुझी उपासना श्रवण आणी नामस्मरण होय. सगळ्यात महत्वाचे सदगुरूंचा उजवा हात झाकलेला आहे आणि डावा हात उघडा आहे. समर्थ म्हणाले की उजवा हात म्हणजे...

आयुष्याची खरी किंमत

  एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडा...

ज्ञानाची उपयुक्तता दिसली पाहिजे

  प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? आपण सांगावे.' 'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!' मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो. एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.' शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.' शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया...